• December 29, 2024
  • No Comment

कीरकोळ वादात पत्नीच्या आतेभावाला टेकडीवरून ढकलले, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कीरकोळ वादात पत्नीच्या आतेभावाला टेकडीवरून ढकलले, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: वाद सोडविण्यासाठी आलेल्या पत्नीच्या आतेभावाला कात्रज टेकडीवर नेऊन जबर मारहाण करण्यात आली. यानंतर त्याला खाणीमध्ये ढकलून देण्यात आले. ही घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अजय अनिल पाचवणे (२१, रा. साठे चौक, लोहगाव) यानी दिलेल्या तक्रारीनुसार शेखर कांबळे, लखन कांबळे आणि अमोल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध आंबेगाव पोलीस घेत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेचा पती शेखर हा सतत तिच्याशी वाद घालून मारहाण करत आहे. त्यामुळे आपल्याला आईकडे सोडावे, असे महिलने आतेभाऊ अजय याला सांगितले.

    त्यानुसार अजय तिच्या घरी गेला. तेथे शेखरने अगोदरच मित्रांना बोलावले होते. त्यांनी अजयला मारहाण करत कात्रज टेकडीवर नेले. तेथे बांबू आणि दगडाने मारहाण करुन दात पाडून हात फ्रॅक्चर केला. अजय तेथून पळून जात असताना त्याला धक्का दिल्याने तो खाणीत पडला.

    त्यामुळे त्याचा मणका आणि दोन्ही हात फ्रॅक्चर झाले. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक कोळी करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *