३१ डिसेंबर सेलिब्रेशन करताय? मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई

    ३१ डिसेंबर सेलिब्रेशन करताय? मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर होणार कारवाई

    पुणे: सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांकडून पार्टीचे प्लॉन सुरू आहेत. यात प्रामुख्याने डीजे नाईट आदी गोष्टी तरुणाईकडून करण्यात येतात.

    या दिवशी अनेकजण मद्य प्राशन करीत असतात. यामुळे या दिवसाच्या अनुषंगाने पुणे पोलीस सज्ज झाले असून वाहतूक शाखेकडून डिस्पोजेबल पाईपच्या माध्यमातून ब्रेथ अॅनलायझरच्या मदतीने ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह विरोधात ३० ठिकाणी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    लोकसभेपाठोपाठ विधानसभेची निवडणूक झाली. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पुणे पोलिसांनी विशेष मोहिम राबविली होती. या काळात मद्यप्राशन वाहने चालवणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली होती.

    १ जानेवारी ते २७ डिसेंबर या काळात ५,२५६ मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्यांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    लॉकडाऊनच्या काळात ब्रेथ अॅनलायझर तपासणीची मोहिम बंद करण्यात आली होती. डिसेंबर २०२३ मध्ये पुन्हा एकदा या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. ३१ डिसेंबर या दिवशी अनेकांकडून नियमांचे उल्लघन करण्यात येते असते. यामुळे आता बंद असलेली ब्रेथ अॅनलायझर तपासणीची विशेष मोहिम पुणे पोलिसांना सुरू राहणार आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *