चोरीच्या रिक्षातून घरफोडी, सराईत गुन्हेगार गजाआड, भारती विद्यापीठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    चोरीच्या रिक्षातून घरफोडी, सराईत गुन्हेगार गजाआड, भारती विद्यापीठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे: रिक्षा चोरुन तिच्या सहाय्याने रिअल इस्टेटच्या कार्यालय फोडून दीड लाखांचे साहित्य चोरणार्‍या दोघा सराईत चोरट्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली.

    कृष्णा कुमार देवेंद्र (वय २०, रा. पंचशील चौक, पर्वती दर्शन), अर्थव प्रदीप शेंडगे (वय १९, रा. म्हसोबा मंदिराशेजारी, पर्वती दर्शन) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    कात्रज कोंढवा रोडवरील विश्वजीम जवळ कनेक्टीफाय इन्फोटेक या रिअल इस्टेटचे कार्यालय चोरट्यांनी फोडून रोख रक्कमेसह, मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून १ लाख ४३ हजार रुपयांचा माल चोरी करुन नेला होता. याप्रकरणी अक्षय श्रावण सातपुते (वय ४३, रा. कात्रज कोंढवा रोड) यांच्या फिर्यादीवरुन घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता.

     

    भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, महेश बारवकर यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाहणी करत असताना हा गुन्हा सराईत गुन्हेगार कृष्णा देवेंद्र व अर्थव शेंडगे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेत असताना ते लेकटाऊन सोसायटी परिसरामध्ये असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडे रिक्षा मिळून आली. रिक्षाबाबत तपास करता ही रिक्षा चोरीचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दीड लाख रुपयांची रिक्षा जप्त केली आहे. वाहन चोरी व घरफोडी असे दोन गुन्हे आरोपींकडून उघडकीस आणण्यात आले आहेत.

    सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील, गुन्हे निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मितेश चोरमाले, सागर बोरगे, मंगेश पवार, चेतन गोरे, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी यांनी केली आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *