• January 2, 2025
  • No Comment

पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटले, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटले, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: प्रवासी तरुणाला धमकावून रिक्षाचालक आणि साथीदारांनी सहा हजारांची रोकड लुटून नेली. पुणे रेल्वे स्थानक परिसरातून रिक्षाचालकाने तरुणाला सोडण्याच्या बहाण्याने त्याला निर्जन ठिकाणी नेऊन लुटले.

    या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत २० वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण चाकण येथून कामानिमित्त ३० डिसेंबरच्या सकाळी सहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात आला. तेथून तो रिक्षाने जाणार होता. तुकाराम शिंदे वाहनतळाजवळ रिक्षाचालकाला त्याने इच्छितस्थळी सोडण्यास सांगितले. रिक्षाचालक आणि त्याच्याबरोबर साथीदार होता.

    तरुणाला रिक्षातून घेऊन त्याला निर्जन ठिकाणी नेले. त्याला शिवीगाळ, तसेच मारहाण करुन खिशातील १२०० रुपयांची रोकड काढून घेतली. त्यानंतर रिक्षाचालकाने त्याच्याकडे आणखी पैसे मागितले. तरुणाने ऑनलाइन पद्धतीने रिक्षाचालकाकडे चार हजार ९०० रुपये जमा केले. तरुणाला सोडून रिक्षाचालक साथीदारासह पसार झाला.

    घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कदम तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *