• January 7, 2025
  • No Comment

साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, कुंजीरवाडी येथील धक्कादायक घटना

साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, कुंजीरवाडी येथील धक्कादायक घटना

    लोणी काळभोर: थेऊर (ता. हवेली) येथे एका तरुण हॉटेल व्यावसायिकाने साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 5) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली होती.

    ही घटना ताजी असतानाच आता दुकानाचे उद्घाटन उद्या मंगळवारी (ता. 7) असतानाच आज सोमवारी (ता. 6) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तरुणाचा मृतदेह कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका विहिरीत आढळून आला आहे.

    एकुलता एक मुलगा हरपल्याने कुंजीरवाडीसह परिसरात शोककळा पसरली आहे. गौरव शशिकांत कुंजीर (वय-35, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) असे मृतदेह आढळल्याचे नाव आहे.

    याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत कुंजीर हे कुटुंबासोबत कुंजीरवाडी परिसरात राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये आहेत. मुलगा गौरव कुंजीर हा शेतीची ठिबक सिंचनची कामे करीत होता. तर गौरव कुंजीर हा ठिबक सिंचनचे साहित्याचे दुकान टाकणार होता. त्यासाठी गौरवने दुकानही पहिले होते. या दुकानाचे उद्घाटन उद्या मंगळवारी (ता. ७) करण्यात येणार होते. यामुळे घराचे सर्व आनंदात होते.

    दरम्यान, रविवारी (ता.5) संध्याकाळी गौरव घरातून गेला तो परत घरी आलाच नाही. त्यामुळे गौरवचे वडील व नातेवाईक त्याचा शोध घेत होते. मात्र गौरव कोठेही आढळून आला नाही. कुंजीरवाडीचे पोलीस पाटील मिलिंद कुंजीर हे शेताकडे चालले होते. तेव्हा मिलिंद कुंजीर यांना कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्र. 916 मधील विहिरीच्या काठावर एक चप्पल आढळून आली. त्यामुळे गौरव कुंजीर हा विहिरीत बुडाला असल्याची शंका त्यांच्या मनामध्ये आली.

    त्यानंतर पोलीस पाटील कुंजीर यांनी या घटनेची माहिती तात्काळ लोणी काळभोर पोलीस व अग्निशामक दलाला दिली. या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार विजय जाधव, दादा हजारे, पोलीस अंमलदार सागर कदम व अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर गौरवला पाण्यातून बाहेर काढले. व उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.

    गौरवच्या दुकानाचे उद्या मंगळवारी उद्घाटन होणार होते. या अगोदरच गौरवचा मृतदेह आज सोमवारी विहिरीत आढळला आहे. त्यामुळे कुंजीरवाडी सह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर आई वडिलांचा एकुलता एक मुलगा गौरव हरपल्याने कुंजीर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गौरव कुंजीर याच्या मृत्यूचे नेमके करण अद्याप समोर आले नसले तरी त्या दृष्टीकोनातून लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *