• January 7, 2025
  • No Comment

भरधाव ट्रकने दुचाकीला दिली धडक; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

भरधाव ट्रकने दुचाकीला दिली धडक; तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

    हडपसर (पुणे): पुण्यात अपघाताचे सत्र सुरुचं असून, पुण्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातचं आता भरधाव ट्रकच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

    हडपसर भागातील शेवाळवाडी चौकात अपघाताची घटना घडली होती. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.ओंकार मधुकर गवळी (वय २७, रा. मरकळ रस्ता, आळंदी देवाची) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मधुकर गवळी (वय ५८) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ओंकार १८ डिसेंबर रोजी हडपसरकडे निघाला होता. त्यावेळी शेवाळवाडी चौकात बोअरवेल खोदाई करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार ओंकारला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या ओंकारला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ओंकार याच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर त्याचे वडील मधुकर यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

    पोलीस उपनिरीक्षक अनिल बिनवडे अधिक तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *