- January 7, 2025
- No Comment
स्वारगेट परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली भलताच ‘धंदा’ करणारी महिला अटक, स्वारगेट पोलिसांची कामगिरी
पुणे: मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसायाकरीता मुली ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवुन घेणार्या महिलेला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे.
हा प्रकार स्वारगेट येथील आकृती चेंबरमधील श्रेया (विरा) आर्युवेदिक मसाज सेंटर येथे शनिवारी दुपारी २ वाजता घडला. याबाबत पोलीस हवालदार प्रिती सचिन मोरे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कात्रज परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय महिलेवर आणि संतोष सर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट येथील विरा आर्युवेदिक मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविले. दोघे आरोपी पिडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून मसाज सेंटरमध्ये पुरुष ग्राहकांना बोलावून पिडित महिलांवर नियंत्रण ठेवून देहविक्री करत. त्यांची कमाई स्वत:च्या उपजिविकेसाठी वापरुन त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करत होते. मसाज सेंटरचा उपयोग कुंठणखाना चालविण्याकरीता करताना मिळून आला.
पोलीस उपनिरीक्षक सुभाष राठोड तपास करीत आहेत.