• January 7, 2025
  • No Comment

दिघीतील व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा, एक लाख ४८ हजारांचा ऐवज हस्तगत

दिघीतील व्हिडीओ गेम पार्लरवर पोलिसांचा छापा, एक लाख ४८ हजारांचा ऐवज हस्तगत

दिघी: दिघी-आळंदी रोडवर गुन्हे शाखेने एका व्हिडीओ गेम पार्लरवर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक लाख ४८ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई शनिवारी (दि. ४) सायंकाळी रॉयल व्हिडीओ गेम पार्लर येथे करण्यात आली.

सुशील सूर्यकांत आवटे (वय २९), विजय दामोदर बरगट (वय ४०), ज्ञानेश्वर मारुती साळुंके (वय ३८) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर काळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी-आळंदी रोडवर रॉयल व्हिडीओ गेम पार्लर मध्ये गेमच्या मशीनवरील आकड्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत एक लाख ४८ हजार ८५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

Related post

अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणात आरोपीला पोक्सोच्या विशेष न्यायालयाकडून जामीन मंजूर

अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध ठेवल्याप्रकरणात आरोपीला पोक्सोच्या विशेष न्यायालयाकडून…

  पुणे: अल्पवयीन मुलीशी शारीरीक संबंध ठेवल्याने त्यातून ती गर्भवती झाली. तिने मुलाला जन्म दिला. पोक्सोच्या या गुन्ह्यात विशेष न्यायालयाने आरोपीला…
सोळा गुन्हे दाखल असलेल्या रवींद्र बऱ्हाटे च्या जामीनाला पोलिसांचा विरोध

सोळा गुन्हे दाखल असलेल्या रवींद्र बऱ्हाटे च्या जामीनाला पोलिसांचा…

पुणे: पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी गेल्या चार वर्षांमध्ये तुरुंगातून तब्बल 708 अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.…
कीरकोळ वादात फायटर घेऊन आला अन्… पुण्यातील कुटुंबाला रक्तबंबाळ होईस्तोवर मारहाण

कीरकोळ वादात फायटर घेऊन आला अन्… पुण्यातील कुटुंबाला रक्तबंबाळ…

पुणे: पुण्यात क्षुल्लक कारणावरून मारहाण, हल्ले, गोळीबार या घटना मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. अशातच पुण्यातील मुंढवा भागात वाहतुकीच्या दरम्यान एका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *