• January 7, 2025
  • No Comment

बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यातून चार लाख ८० हजारांची फसवणुक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यातून चार लाख ८० हजारांची फसवणुक, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    हिंजवडी (पुणे): बांधकाम व्यावसायिकाच्या खात्यातून चार लाख ८० हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. ही घटना २५ सप्टेंबर २०२४ रोजी हिंजवडी येथे घडली. बांधकाम व्यावसायिकाने संबंधित व्यक्तीला पैसे परत पाठवण्यास सांगितले.

    मात्र त्याने पैसे परत न पाठवता बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केली.

    याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एम एस कवलजोत ट्रेडिंग कंपनीचे मालक गुरपाल लालसिंग सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ऑफिस मधील सर्वर डाऊन झाले. काही वेळाने त्यांचे सर्वर सुरु झाले. दरम्यानच्या काळात फिर्यादी यांच्या खात्यावरून चार लाख ८० हजार रुपये एम एस कवलजोत ट्रेडिंग कंपनीचे मालक गुरपाल लालसिंग सिंग यांच्या खात्यावर ट्रान्सफर झाले होते. फिर्यादी यांनी सिंग यांच्याशी संपर्क करून पैसे परत पाठवण्यास सांगितले. मात्र पैसे परत न पाठवता त्यांची फसवणूक करण्यात आली.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *