• January 7, 2025
  • No Comment

वाघोलीतील ‘हॉट 8 कॅफे’चा पर्दाफाश, तरुणांना हुक्का साहित्य उपलब्ध करुन देत, त्यांना व्यसनी बनविण्याचा काम सुरु होते

वाघोलीतील ‘हॉट 8 कॅफे’चा पर्दाफाश, तरुणांना हुक्का साहित्य उपलब्ध करुन देत, त्यांना व्यसनी बनविण्याचा काम सुरु होते

    वाघोली: महाविद्यालयीन तरुणाचा वावर असलेल्या परिसरात कॉटेज रुम बनवून त्यात तरुणाला हुक्का साहित्य उपलब्ध करुन देण्यात येऊन त्यांना व्यसनी बनविण्याचा काम सुरु होते.

    बंदी असतानाही हॉटेलमधील कॉटेज रुममध्ये ग्राहकांना हुक्का साहित्य पुरविण्यात येत होते. कॉटेज रुममधून येत असल्याल्या वासावरुन पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली आहे.

    याबाबत पोलीस अंमलदार विशाल भिमराव गायकवाड यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव व्यंकट कळसे (वय २२, रा. हॉट ८ कॅफे, वाघोली) याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी रात्री पावणेबारा वाजता उघडकीस आला.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी जे एस पी एम रोड परिसरातील हॉट 8 कॅफे मध्ये ग्राहकांना हुक्का पुरविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉट ८ या कॅफेवर छापा घातला. तेव्हा हॉटेलमध्ये कॉटेज रुममध्ये ग्राहकांना तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर व त्यासाठी लागणारे हुक्का साहित्य पुरवित असल्याचे दिसून आले. पोलिसांनी माधव कळसे याला अटक करुन ११५० रुपयांचे हुक्का फ्लेवर व साहित्य जप्त केले आहे़. पोलीस हवालदार प्रशांत कर्णवार तपास करीत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *