• January 7, 2025
  • No Comment

12 वर्षांच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, आळंदीतील खासगी संस्थेतील धक्कादायक प्रकार

12 वर्षांच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार, आळंदीतील खासगी संस्थेतील धक्कादायक प्रकार

    आळंदी: आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. शनिवारी (4 जानेवारी) मध्यरात्री एका खासगी शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला असून याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

    याप्रकरणी पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय तरुण पाहुणा बनून संबधित खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत आला होता. तरुणाने संस्थेत शिकणाऱ्या 12 वर्षांच्या दोन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले. हा सर्व प्रकार शनिवारी (4 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. महेश मिसाळ असा या तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत त्याच्या बहिणीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदीच्या वडगाव रस्त्याला एक शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेमध्ये महेश मिसाळ हा पाहुणा म्हणून आला होता. मुलांवर अत्याचार झाल्याची माहिती शिक्षकांना मिळाल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.

    याप्रकरणी आळंदी पोलिसांनी मुख्य आरोपी महेश मिसाळसह त्याच्या बहिणीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या त्या दोघांनाही अटक केली असून आळंदी पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. यापूर्वी ताने कधी असे प्रकार केले आहेत का? यासंदर्भात पोलीस त्याची चौकशी करत आहेत. पण घटनेमुळे या खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेप्रकरणी स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. तसेच आरोपींन कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *