- January 7, 2025
- No Comment
पुणे येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पैशांची मागणी करणार्या तरुण जेरबंद

पुणे: एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण केले. तिला लॉजवर नेऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. तिच्या ‘इन्स्टाग्राम’च्या खात्यावर तिचे नग्न, अर्धनग्न तसेच पूर्ण कपडे घातलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली.
तिच्यावर दबाव टाकून पैशांची मागणी केल्याप्रकरणी श्रीयश पतंगे या तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. हा प्रकार जून २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये घडला आहे.




