• January 8, 2025
  • No Comment

दोन्ही मुली झाल्याने तोंडी तलाक देऊन काढले घराबाहेर;, पाच जणांवर मुस्लिम महिला विवाह सरंक्षण हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल

दोन्ही मुली झाल्याने तोंडी तलाक देऊन काढले घराबाहेर;, पाच जणांवर मुस्लिम महिला विवाह सरंक्षण हक्क कायद्यानुसार गुन्हा दाखल

    पुणे: त्यांना मुलगा हवा होता. पण तिला दोन्ही मुली झाल्याने त्याने तीन वेळा तलाक तलाक तलाक म्हणून तिला तलाक दिला. तुझा व तुझ्या मुलींचा माझ्याशी काही संबंध नाही, असे बोलून त्यांना घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केल्याचा प्रकार समोर आला आहे.

    याबाबत २९ वर्षाच्या पिडिताने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिचा पती (वय ४०), सासु (वय ५९), नणंद (वय ३५), दीर ३१) आणि पतीची नवीन पत्नी (वय ३०) यांच्यावर मुस्लिम महिला विवाह सरंक्षण हक्क कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै २०१४ ते ३ जानेवारी २०२५ पर्यंत सुरु होता.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सासरी नांदत असताना सर्व आरोपींनी मिळून फिर्यादीस माहेरहून पैसे घेऊन ये, म्हणून छळ केला. तसेच त्यांना मुलगा पाहिजे होता. पण फिर्यादीस दोन्ही मुली झाल्याने शारीरीक व मानसिक त्रास देऊन मारहाण व शिवीगाळ केली. फिर्यादीच्या पतीने फिर्यादीस तीन वेळा तलाक, तलाक, तलाक असे म्हणून तलाक दिला. तुझा व तुझ्या मुलींचा माझ्याशी काही संबंध नाही, असे बोलून फिर्यादी व त्यांच्या दोन्ही मुलींना घरातून हाकलून दिले.

    फिर्यादी या त्यांच्या घरी असताना फिर्यादीची नणंद, सासु, पतीची नवीन पत्नी तसेच दीर हे फिर्यादीच्या घरात घुसले. सासु व नणंद यांनी फिर्यादीचे दोन्ही हात पकडून केस ओढून तू आमच्या विरोधात तक्रार करतेस का, असे बोलून शिवीगाळ केली. फिर्यादी व तिच्या मुलींना मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. याच फोनमध्ये मेसेज आहेत ना, असे बोलून फिर्यादीचा फोन फरशीवर आपटून फोडून नुकसान केले. मुलींकडे असलेले फोन फिर्यादीच्या संमतीशिवाय घेऊन गेले. फिर्यादीचा दीर हे बॅट घेऊन त्यांना मारण्यासाठी अंगावर धावुन गेले. पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *