• January 8, 2025
  • No Comment

आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ५०,००० रुपयांचे कर्ज; कसा करा अर्ज!

आधार कार्डद्वारे कोणत्याही हमीशिवाय मिळणार ५०,००० रुपयांचे कर्ज; कसा करा अर्ज!

    आता तुम्हाला केवळ आधारकार्डवर हमीशिवाय ५० हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. तुमचाही यावर विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हे अगदी खरे आहे. आधार कार्डद्वारे तुम्हाला ५०००० रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. कोविड काळात २०२० मध्ये सरकारने छोट्या व्यावसायिकांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री स्वानिधी योजना सुरू केली होती. छोटे व्यापारी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वावलंबी बनवणे हा त्याचा उद्देश होता.

    कर्ज फेडायला १२ महिन्यांचा मुदत:

    या योजनेअंतर्गत छोटे व्यावसायिक कोणत्याही हमीशिवाय आधार कार्डवर कर्ज घेऊ शकतात. पण, ही योजना चालते कशी? याची परतफेड कशी करायची असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आले असतील. यामध्ये व्यावसायिकांना प्रथम १०,००० रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. जर त्यांनी त्याची वेळेवर परतफेड केली, तर पुढच्या वेळी त्यांना २०,००० रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि जर त्यांनी तेही वेळेवर परतफेड केली तर कर्जाची रक्कम ५०,००० रुपये केली जाते. कर्जाची परतफेड १२ महिन्यांत हप्त्यांमध्ये करावी लागते.

    कर्जासाठी कुठे करायचा अर्ज?

    आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन योजनेसाठी अर्ज करू शकता. तुम्ही थेट पोर्टलवर किंवा तुमच्या क्षेत्रातील कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट देऊन कर्जासाठी अर्ज करू शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करणे आवश्यक आहे. कारण तुम्ही कर्जासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास व्हेरिफिकेशनसाठी त्याची गरज लागेल.

    आधार कार्डवर कर्ज घेण्यासाठी काय पात्रता आहेत?

    कर्जासाठी अर्ज करणाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेकडून शिफारस पत्र घ्यावे लागेल. जेणेकरुन त्यांना भविष्यात सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळू शकेल. यानंतर मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल. याशिवाय इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. या योजनेअंतर्गत, कर्ज घेणाऱ्यांच्या चार श्रेणी तयार केल्या गेल्या आहेत, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी, व्यक्तींनी पोर्टलवर त्यांची पात्रता स्थिती तपासली पाहिजे.

    कर्जावर किती व्याज द्यावे लागेल?

    व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB), लघु वित्त बँका (SFBs) आणि सहकारी बँकांचे व्याजदर सध्याच्या दरांनुसार असतील. तर एनबीएफसी, एनबीएफसी-एमएफआई इत्यादींसाठीचे व्याजदर त्यांना दिलेल्या RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठरवले जातील. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांतर्गत समाविष्ट नसलेल्या इतर कर्जदारांच्या श्रेणींसाठी, NBFC-MFI साठी सध्याच्या RBI मार्गदर्शक तत्त्वांनुसार व्याजदर निर्धारित केले जातील.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *