• January 8, 2025
  • No Comment

कोयता बाळगल्या प्रकरणी चऱ्होली बुद्रुकमध्ये तरुण गजाआड

कोयता बाळगल्या प्रकरणी चऱ्होली बुद्रुकमध्ये तरुण गजाआड

    पिंपरी-चिंचवड: कोयता बाळगल्या प्रकरणी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) दुपारी चऱ्होली बुद्रुक येथे करण्यात आली.

    आकाश नंदू पठारे (वय 23, रा.चऱ्होली बुद्रुक, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर कदम यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चऱ्होली बुद्रुक येथील वाघेश्वर महाराज क्रीडा संकुलासमोर एक तरुण शस्त्र घेऊन आल्याची माहिती मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आकाश पठारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला आहे.

    पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *