• January 9, 2025
  • No Comment

पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण, चार टाळकी रावेत पोलिसांकडून जेरबंद

पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण, चार टाळकी रावेत पोलिसांकडून जेरबंद

    पिंपरी-चिंचवड: जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला मारहाण केली. ही घटना मुकाई चौक रावेत येथे घडली. करण किशोर मोरे (वय 25, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

    त्यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश अनंता टोंपे (वय 21), सुरज बिरू बुधनर (वय 21), यश श्रीपाद खोंडवे (वय 24), रोहन राहुल मस्के (वय 21, सर्व रा. चिंचवड) यांना पोलिसांनी अटक केली आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांचे मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी करण मोरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. ऋषिकेश याने प्लास्टिकची खुर्ची करण यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *