- January 10, 2025
- No Comment
मोक्क्यातील गुन्ह्यात एक वर्ष फरार असलेल्या आरोपी अटक, गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाची कामगिरी
पुणे: खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने पोलिसांनी त्याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती.
तेव्हापासून तो फरार होता. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथकाला मिळालेल्या माहितीवरुन त्यांनी या फरारी गुंडाला पकडले.
मोन्या ऊर्फ प्रज्योत बाळकृष्ण उमाळे (वय २३, रा. राजीव गांधीनगर, खडकी) असे या गुंडाचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा मोन्या उमाळे याच्यासह त्याच्या साथीदारांवर २०२३ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल होता. या टोळीवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून मोन्या उमाळे हा फरार झाला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथकातील पोलीस अंमलदार जहांगीर पठाण व विशाल इथापे यांना मोन्या उमाळे हा खडकी बाजारमधील गाडी अड्डा येथे बसला असल्याची माहिती मिळाली. या बातमीची खात्री करुन पोलिसांनी मोन्या उमाळे याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने साथीदारांसह खुनाचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यामुळे सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग यांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.