- January 11, 2025
- No Comment
सोळा गुन्हे दाखल असलेल्या रवींद्र बऱ्हाटे च्या जामीनाला पोलिसांचा विरोध
पुणे: पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र बऱ्हाटे यांनी गेल्या चार वर्षांमध्ये तुरुंगातून तब्बल 708 अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी मागितलेल्या माहितीमध्ये तुरूंग प्रशासनाने यासंबंधीचे उत्तर दिले आहे.
रवींद्र बऱ्हाटे यांनी 2022 मध्ये 397 तर 2023 मध्ये 184 अर्ज केले आहेत. याशिवाय राज्य आणि केंद्रातील मंत्री, अधिकारी, पोलिस, सनदी अधिकाऱ्यांच्या नावाने देखील अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. रवींद्र बऱ्हाटे यांनी उच्च न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, पुणे पोलिसांनी या जामीन अर्जाला विरोध दर्शवला आहे.
माहिती अधिकाराचा चांगला आणि वाईट वापर कशा प्रकारे होऊ शकतो, याचं सर्वांत उत्तम उदाहरण हे रवींद्र बऱ्हाटे आहेत. माहिती अधिकाराचा वापर करून रवींद्र बऱ्हाटे पुणे शहरामध्ये चांगलेच चर्चेत आले. त्यावेळी त्यांचं कौतुक देखील झालं. मात्र, त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी देखील रवींद्र बऱ्हाटे यांच्यासोबत काही प्रकरणे हाताळली. मात्र जेव्हा रवींद्र बऱ्हाटे यांच्याकडून माहिती अधिकाराचा गैरवापर होऊ लागला तेव्हा रवींद्र बऱ्हाटे यांच्यावर आरोप होऊ लागले. त्यांच्यावर खंडणी, अपहरण, फसवणुकीचे असे सोळा गुन्हे त्यांच्यावरती दाखल करण्यात आले. त्यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई झाली. छत्रपती संभाजी नगरच्या तुरूंगात त्यांची रवानगी झाली.
रवींद्र बऱ्हाटे फरार होते. त्यांची रवानगी तुरूंगात झाली तरी देखील त्यांनी माहिती अधिकाराचा वापर करणे बंद केलं नाही. त्यांनी तुरुंगातून तब्बल 708 अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.