- January 11, 2025
- No Comment
किरकोळ वादातून तरुणीला भर रस्त्यात मारहाण
शिवाजीनगर पुणे: जोरजोराने हॉर्न वाजवल्याचा जाब विचारल्याने चिडलेल्या दुचाकीस्वाराने एका तरुणीला शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ ८ जानेवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अभिषेक दोरास्वामी (रा. शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ) याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ११५ (२), ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही तरुणी रस्त्याने जात होती. त्यावेळी आरोपी पाठीमागून दुचाकीवर आला. त्याने जोरजोरात हॉर्न वाजविण्यास सुरुवात केली. त्यावेळी या तरुणीने हॉर्न का वाजवित आहेस अशी विचारणा केली.
तेव्हा आरोपीने ‘तुला दिसत नाही का? आंधळी आहेस का?’ असे म्हणत जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला हाताने मारहाण केली. तसेच अंगावर धावून येत बघून घेण्याची धमकी दिली.