• January 11, 2025
  • No Comment

पुर्ववैमनस्यातून महिलेच्या घरात घुसून तोडफोड, कोयता हवेत फिरवून माजवली दहशत

पुर्ववैमनस्यातून महिलेच्या घरात घुसून तोडफोड, कोयता हवेत फिरवून माजवली दहशत

    भोसरी (पुणे): महिलेने चपलेने मारल्याचा बदला घेण्यासाठी स्वंयघोषीत भाईने साथीदारांसह महिलेच्या घरात घुसून तोडफोड, लुटमार केल्याची घटना भोसरीतील बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडली. तसेच हवेत कोयता फिरवत परिसरात दहशत निर्माण केली.

    याप्रकरणी महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास फिर्यादी महिला घरी झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपी तिथे आले. फिर्यादी महिलेच्या बहिणीने एका आरोपीला चपलेने मारल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या दरवाजा व खिडकीवर दगडफेक करीत काच फोडली.

    त्यानंतर महिलेच्या घरात घुसून त्यांची पर्स नेली. जाताना घराबाहेर ठेवलेली वॉशिंग मशीन आणि दुचाकीची तोडफोड केली. हातातील कोयता हवेत फिरवून ‘मी इथला भाई आहे, तुम्ही कोणी मध्ये आलात तर कोणालाच सोडणार नाही’, असे म्हणत दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *