• January 11, 2025
  • No Comment

तोल जाऊन पडल्याने रंगकाम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू, ठेकेदाराविरुद्ध गु्न्हा दाखल

तोल जाऊन पडल्याने रंगकाम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू, ठेकेदाराविरुद्ध गु्न्हा दाखल

    चंदननगर: रंगकाम करणाऱ्या कामगार शिडीवरुन तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव शेरी भागातील घटना घडली. सुरक्षाविषयक उपायोजना न करता कामगाराच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध चंदननगर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.

    अमरनाथ भागीरथी भारती (वय ५४, रा. उत्तमनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई महेश भोंगळे यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीतील परफेक्ट बाऊंटीफोर इमारतीच्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. तेथे अमरनाथ हे रंगकाम करत होते. गुरुवारी (९ जानेवारी) इमारतीत काम करताना शिडीवरुन तोल जाऊन पडल्याने अमरनाथ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या अमरनाथ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरक्षाविषयक उपाययोजना न केल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चंदननगर पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *