• January 11, 2025
  • No Comment

पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी येथे गॅस वितरण कर्मचाऱ्यांना लुटणारे जेरबंद

पिंपरी-चिंचवडमधील नवी सांगवी येथे गॅस वितरण कर्मचाऱ्यांना लुटणारे जेरबंद

    नवी सांगवी: सिलिंडरमधील गॅसचे वजन कमी असल्याचा बहाणा करीत चार सराईत चोरट्यांनी गॅस वितरण कर्मचाऱ्यांना लुटले. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी तपासचक्रे फिरवत सराईत गुन्हेगारांना अटक केली.

    या प्रकरणी बागी जगमलराम बिष्णोई (वय ४०, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय ३०, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), हरिश्चंद्र रामचंद्र साळवी (वय २५), सोहम संजय खंडारे (वय २१) आणि जगदीश एकनाथ कंकाळे (वय २१, तिघेही रा. र्चहोली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी सोमनाथ प्रकाश पाटोळे याच्यावर पुणे शहर पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल १७ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखले आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १२ डिसेंबर २०२४ आणि ८ जानेवारी २०२५ या दिवशी नवी सांगवी येथे घडली. फिर्यादी विष्णोई हे गॅस सिलिंडरचा टेम्पो घेऊन चालले होते. बुधवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास ते कृष्णानगर येथे आले असता आरोपींनी त्यांचा टेम्पो अडविला. घरगुती गॅस सिलिंडरचे वजन वैध वजनापेक्षा कमी असल्याचे सांगून फिर्यादी यांना दमदाटी केली. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी १ लाख रुपयांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता आरोपींनी त्यांना मारहाण करीत शर्टाच्या खिशातून पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच १२ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास याच आरोपींनी सुनील भगवानराम बिष्णोई यांना याच कारणावरून धमकावून आरोपी सोहम खंडारे याच्या खात्यावर ५० हजार रुपये ऑनलाईन पाठविण्यास भाग पाडले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *