• January 13, 2025
  • No Comment

पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

    भोसरी: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

    ७० टक्के आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आला आहे.

    भोसरी एमआयडीसीमध्ये रबर आणि प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचल आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ७० टक्के आग विझवल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. आगीने रौद्ररूप धारण केलं असल्याने उर्वरित ३० टक्के आग विझवण्यात अडथळा येत आहे. अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. काही किलोमीटर अंतरावरून धुरांचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. अद्याप आगीचं कारण अस्पष्ट आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *