- January 16, 2025
- No Comment
गावठी कट्ट्यातून मित्रावरच गोळीबार

मोबाईल गेम खेळताना दोन मित्रांमध्ये चेष्टा मस्करी आणि वाद झाल्यानंतर एका मित्राने दुसर्या मित्रा वर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. सिंहगड कॉलेज परिसरात गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. गोळीबार करणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे