• January 17, 2025
  • No Comment

आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

आठव्या वेतन आयोगाला मंजुरी

    संपूर्ण देशाचं लक्ष आठव्या वेतन आयोगाकडं लागलं होतं, मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आठव्या वेतन आयोगाच्या गठणाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार आहे.अजून आठवा वेतन आयोग गठीत करण्यात आलेला नाही,किंवा त्याबाबतचं चित्र देखील पुरेस स्पष्ट नाही.मात्र आता लवकरच त्याबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ मिळणार आहे, चपराशापासून ते आयएएस अधिकाऱ्यापर्यंत पगारात मोठी वाढ होणार आहे.

    आठव्या वेतन आयोगाबाबत अजून कोणतंही चित्र स्पष्ट नाही. मात्र सातव्या वेतन आयोगातील तरतुदीवरून आठव्या वेतन आयोगाचा अंदाज लावला जाऊ शकतो. जाणून घेऊयात जर आठवा वेतन आयोग लागू झाल्यास वर्गवारीनुसार अंदाजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात किती वाढ होऊ शकते

    अंदाजे किती वाढ होऊ शकते?

    सातवा वेतन आयोग जेव्हा लागू करण्यात आला होता, तेव्हा लेव्हल वनचे कर्मचारी चपराशी, सफाई कामगार यासारख्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन 18,000 रुपयांवर पोहोचलं होतं. जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचं बेसिक वेतन 21,300 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.लेव्हेल 2 चे जे कर्मचारी आहेत त्यांचं बेसिक वेतन सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा 19,900 इतकं होतं ते आता 23,880 रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. लेव्हल तीनच्या कर्मचाऱ्याच बेसिक वेतन 21,700 वरून 26,040 रुपये, लेव्हल चारच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन 25,500 वरून 30,600 वर तर लेव्हल पाचच्या कर्मचाऱ्याचं वेतन 29,200 वरून 35,040 वर पोहोचण्याची शक्यता आहे.

    कर्मचाऱ्यांकडून निर्णयाचं स्वागत

    दरम्यान मोदी सरकारकडून आठवा वेतन आयोगाच्या गठणाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज मिळाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांकडून मोदी सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे. लवकरच वेतन आयोग गठीत केला जाण्याची शक्यता आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *