• January 17, 2025
  • No Comment

तरुणासोबत फेसबुकवर ओळख नाजूक क्षणांचं चित्रीकरण करत ब्लॅकमेलिंग करून लग्न आणि शारीरिक छळ

तरुणासोबत फेसबुकवर ओळख नाजूक क्षणांचं चित्रीकरण करत ब्लॅकमेलिंग करून लग्न आणि शारीरिक छळ

    उल्हासनगरात एका तरुणीची एका तरुणासोबत फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि प्रेमात झालं. मात्र तरुणाने त्यांच्यातल्या काही नाजूक क्षणांचं चित्रीकरण करत तिला ब्लॅकमेल करून तिच्याशी लग्न केलं आणि लग्नानंतर माहेरुन पैसे आणण्यासाठी अक्षरशः सिगारेटचे चटके दिल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी या तरुणीच्या तक्रारीवरून पतीविरोधात बलात्काराचा, तर सासरच्या मंडळींविरोधात शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिकची माहिती अशी की, उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणीची काही वर्षांपूर्वी फेसबुकवर एका तरुणाची ओळख झाली. या ओळखीतून झालेल्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्यांच्या गाठीभेटीही वाढल्या. एकदा या दोघांमधील नाजूक क्षणांचं प्रियकराने मोबाईलमध्ये चित्रीकरण केलं आणि तो व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल करत तिच्याशी मनाविरुद्ध लग्न केलं.

    असह्य झाल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली

    लग्नानंतरही अत्याचाराची ही कहाणी थांबली नाही. तिला माहेरून पैसे आणि विविध वस्तू आणण्यासाठी सासरच्यांनी छळायला सुरुवात केली. काही वेळा माहेरच्यांनी या मागण्या पूर्ण देखील केल्या, मात्र त्यामुळे सासरच्या मंडळींची हाव आणखीनच वाढली. त्यातूनच अक्षरशः तिला सिगारेटचे चटके देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. अखेर हा सगळा छळ असह्य झाल्याने या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेतल्यामुळे तिने न्यायालयात खासगी केस दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणात पती आणि सासरच्या मंडळींविरोधात बलात्कार, मारहाण आणि शारीरिक छळाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर मात्र विठ्ठलवाडी पोलिसांनी या तरुणीचा गुन्हा दाखल करून घेतला. तसंच तिच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली असून दुसरीकडे तरुणीने दाखवलेल्या या धाडसाचं कौतुक होतंय

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *