• January 17, 2025
  • No Comment

येरवडा परिसरातून मॅफेड्रॉन या अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त

येरवडा परिसरातून मॅफेड्रॉन या अंमली पदार्थाचा  मोठा साठा जप्त

    पुणे : पुणे ड्रग्ज फ्री या मोहिमेच्या अंतर्गत शहरात होणारा अंमली

    पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीन गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथक सातत्याने कारवाई करीत असते. येरवडा भागात केलेल्या एका कारवाईत अंमली पदार्थाची विक्री करत असलेल्याकडून पोलिसांनी २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त केले आहे. अहमद वाहिद खान (वय ४५, रा. लक्ष्मीनगर, समता मित्र मंडळाजवळ,येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व अंमलदार हे येरवडा परिसरात बुधवारी १५ जानेवारी रोजी पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना बातमी मिळाली. त्या बातमीची खात्री करुन पोलिसांनी अहमद खान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगची झडती घेतली असता त्यात २२ लाख रुपयांचा ११० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) हा अंमली पदार्थ तसेच इतर ऐवज असा २३ लाख ३८ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त

    रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शना गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, साहिल शेख, रवींद्र रोकडे, चेतन गायकवाड, अझिम शेख, संदिप जाधव, दिशा खेवलकर, दिनेश बास्टेवाड, अमोल गायकवाड, विशाल निलख यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *