• January 17, 2025
  • No Comment

चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुबाडणाऱ्या एकाला पोलिसांकडून अटक

चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुबाडणाऱ्या  एकाला पोलिसांकडून अटक

    पुणे : पायी जाणाऱ्याला तिघा जणांच्या टोळक्याने चाकूचा धाक दाखवून तरुणाच्या खिशातील रोख रक्कम, मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेण्यात आला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांपैकी एकाला अटक केली आहे. याबाबत अमोल रामसिंग राठोड (वय ३४, रा. अशोकनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्षय लक्ष्मण ससाणे (वय २६, रा. गांधीनगर, येरवडा) याला अटक केली असून

    त्यांच्या दोन साथीदारांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार येरवड्यातील अशोकनगरमध्ये ११ जानेवारी रोजी रात्री पावणेदहा वाजता घडला होता.

    याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमोल राठोड हे वाहनचालक म्हणून काम करतात. ते रात्री पायी घरी जात होते. त्यावेळी अशोकनगरमध्ये तिघांना त्यांना अडवून चाकूचा धाक दाखविला. त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरुन नेली. राठोड यांनी घाबरुन पोलिसांकडे तक्रार दिली नव्हती. पोलिसांनी अक्षय ससाणे याला पकडले. त्याच्याकडील चोरीच्या मोबाईलवरुन राठोड यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी आपल्याला चाकूचा धाक दाखवून लुबाडले असल्याचे सांगून तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *