- January 17, 2025
- No Comment
जुगारामध्ये हरलेल्या पैसे परत मिळविण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी

पुणे : जुगारामध्ये हरलेल्या पैसे परत मिळविण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी करणाऱ्या भावाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक दोनच्या पथकाने अटक केली आहे. श्रीकांत दशरथ पांगरे अस अटक करण्यात आलेल्या भावाचे नाव आहे. आरोपी श्रीकांत गावी जुगारात पाच एकर जमीन हरला होता, त्यामुळे
जुगारात हरलेली जमीन परत मिळविण्यासाठी त्याने त्याच्या बहिणीच्या घरात येऊन जवळपास 9 लाख 37 हजार 500 रुपये किमतीचे 125 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचं पोलिस तपासात उघडकीस आल आहे.




