- January 17, 2025
- No Comment
चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले
चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले, मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी ही पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर दिली आहे एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते, तेंव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले.
या थरारक घटनेचे व्हिडीओ सुद्धा समोर येत आहेत. चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर चालकाने हा प्रताप केलाय अपघातात अनेक जण जखमी ही झालेत.चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिलाय.शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे.