- January 19, 2025
- No Comment
जुगारप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने काळेवाडीतील तापकीरनगर येथे केलेल्या कारवाईत जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
कालिदास ज्ञानेश्वर दिवसे (वय ४४), नथुराम शंकर बनकर (वय ५६), सूरज भास्कर पाटील (वय ३१), देवराम आत्माराम रागपसरे (वय ३३), सुनील मधुकर ढोकळ (वय ५४), कबीर मुनीर सय्यद (वय ४५), अक्षय सुरेश गुंजेकर (वय ३१) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हे आरोपी भारत माता चौक येथील एका शाळेशेजारी पत्त्यांचा जुगार खेळताना मिळून आले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा जुगार कोण चालवितो? असे पोलिसांनी विचारले असता बिंदू यादव हा जुगार चालवीत असल्याचे आरोपींनी सांगितले.