- January 19, 2025
- No Comment
मॅफेड्रॉन’ बाळगणारे दोन सराईत जेरबंद, अमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

पुणे: लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात ‘मॅफेड्रॉन’ बाळगणार्या हुसेन नूर खान आणि फैजान शेख यांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे.
फैजान याचे महात्मा गांधी रस्त्यावरील कोळसे गल्लीत कुलूप विक्रीचे दुकान आहे.
तो या दुकानातून अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून २ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १५ लाख ७० सहस्र रुपयांचे ७७ ग्रॅम ‘मॅफेड्रॉन’ जप्त केले आहे.




