- January 19, 2025
- No Comment
कीरकोळ वादात तरुणाला बेदम मारहाण, तीन टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

पिंपरी: टेम्पो सावकाश चालव, असे म्हटल्याच्या रागातून चौघांच्या टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना वाकडमधील छत्रपती चौक येथे घडली.
याप्रकरणी प्रफुल्ल विवेक वैद्य (रा.ऐश्वर्यम ग्रीन्स, कस्पटे वस्ती, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पोचालक व इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाकडमधील छत्रपती चौक येथे मित्राची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी फिर्यादी यांच्या अंगावर एक टेम्पो येत असताना फिर्यादी त्या टेम्पो चालकाला टेम्पो थोडासा सावकाश चालव असे बोलले. त्यावर टेम्पोचालक ‘माझा टेम्पो आहे, मी कसा पण चालवेन’ असे रागाने बोलला. त्यानंतर टेम्पोतील तीन मुले खाली उतरली. सर्वांनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. टेम्पोचालकाने कटर सारख्या हत्याराने फिर्यादीच्या हातावर मारून जखमी केले. तर इतर आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण केली.
पुढील तपास वाकड पोलिस करीत आहेत.




