• January 22, 2025
  • No Comment

पुण्यात सायबर चोरट्यांचा धमाकुळ, महिलेची १३ लाखांची फसवणूक

पुण्यात सायबर चोरट्यांचा धमाकुळ, महिलेची १३ लाखांची फसवणूक

    पाषाण (पुणे): काळ्या पैसे व्यवहारात कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी पाषाण भागातील एका महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादर महिला पाषाण भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी २ जानेवारी रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मुंबई गुन्हे शाखेकडून काळ्या पैसे व्यवहारात कारवाई करण्यात येणार आहे.

    महिलेच्या बँक खात्याचा वापर व्यवहारांसाठी करण्यात आला असल्याची भीती चोरट्यांनी दाखविली. त्यानंतर याप्रकरणात अटक टाळण्यासाठी (डिजिटल ॲरेस्ट) तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून चोरट्यांनी महिलेला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने चोरट्यांच्या खात्यात १३ लाख २३ हजार रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *