• January 23, 2025
  • No Comment

डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू, डंपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

डंपरच्या धडकेत युवतीचा मृत्यू, डंपचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

    बाणेर (पुणे): भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवतीचा मृत्यू झाल्याची घटना बाणेर भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली असून, पसार झालेल्या डंपचालकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    मुक्ता संतोष काळे (वय १९, रा. म्हाळुंगे, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार महिला शिल्पा कांबळे (वय ३६, रा. बालेवाडी गाव) जखमी झाल्या. याबाबत कांबळे यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मुक्ता काळे ब्युटीपार्लर प्रशिक्षण अभ्यासक्रम करत होती. मंगळवारी (दि.२१) सकाळी अकराच्या सुमारास शिल्पा कांबळे आणि मुक्ता काळे बाणेर भागातील गणराज चौकातून निघाल्या होत्या. त्या वेळी सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला भरधाव डंपरने पाठीमागून धडक दिली.

    यात मुक्ता डंपरच्या चाकाखाली सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार शिल्पा यांना दुखापत झाली. सहायक पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *