• January 23, 2025
  • No Comment

कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक

कामगाराच्या घराला भीषण आग, पाच लाखांची रोकड जळून खाक

    पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात असलेल्या काशीद पार्कजवळील एका बिगारी कामगाराच्या घराला गुरुवारी भीषण आग लागली. या आगीत या कामगारांचे अंदाजे पाच लाख रुपये जळून खाक झाले आहेत.

    घराला आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही.

    अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्र आणि रहाटणी अग्निशमन केंद्रातून चार अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले यांनी दिली.

    दाट लोकवस्तीमुळे अग्निशमन बंबाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला. आग २० मिनिटांत आटोक्यात आणण्यात आली. कामगाराने घरात ठेवलेली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू जळल्या. २० पत्र्याची घरे या आगीत उद्ध्वस्त झाली असून, सुमारे पाच लाख रुपये रोख रक्कम आणि पाच तोळे सोन्याचे दागिने असे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने वर्तविला आहे.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *