• January 24, 2025
  • No Comment

टँकरच्या चाकाखाली येऊन एका वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू; हडपसर परिसरातील घटना

टँकरच्या चाकाखाली येऊन एका वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू; हडपसर परिसरातील घटना

    हडपसर: हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. टँकरच्या चाकाखाली येऊन एक वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे. कृष्णा राहुल महतो असे मृत्युमुखी पडलेल्या चिमूकल्याचे नाव आहे.

    याप्रकरणी बबीतादेवी राहुल महतो (वय २२, सध्या रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादिवरून हडपसर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरच्या चाकाखाली येऊन एक वर्षाच्या चिमूकल्याचा मृत्यू झाला आहे. कृष्णा राहुल महतो असे मृत्युमुखी पडलेल्या चिमूकल्याचे नाव आहे. महतो दाम्पत्य सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची भागातील एका भंगाराच्या दुकानात कामाला आहेत. तिथेच ते वास्तव्यास आहेत.

    मंगळवारी (२१ जानेवारी) दुपारी तीन वाजेच्या सुमारास महातो यांचा एक वर्षांचा मुलगा कृष्णा भंगार माल दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत खेळत होता. त्याची आई बबीतादेवी यांनी त्याला चटईवर खेळायला ठेवले होते. त्यावेळी तेथे आलेल्या पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली तो सापडला. आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर टँकर चालक तेथून पसार झाला आहे.

    या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *