- January 24, 2025
- No Comment
बावधन, रहाटणीमध्ये जुगार अड्ड्यावर छापे, ३१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पिंपरी: बावधन आणि रहाटणी परिसरात सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मंगळवारी (दि. २१) छापे मारले. दोन्ही कारवायांमध्ये एकूण ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमान चौक येथे बावधन पोलिसांनी कारवाई केली. रमेश बबन दगडे (वय ५४, रा. बावधन) हा व्हॉट्सअॅप वरून लोकांकडून मटका नावाचा जुगार घेत होता. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि १५०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. रमेश याने त्याच्याकडे आलेले जुगारातील आकडे आणि पैसे पवन कोल्हे याला पाठविले. त्यामुळे रमेश दगडे याच्यासह पवन कोल्हे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई
रहाटणी: काळेवाडी पोलिसांनी रहाटणी येथे दुसरी कारवाई केली.
अमोल राम विटेकर (वय ४६) आणि महेश सिद्धार्थ जाधव (वय ३६, दोघे रा. राहटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी त्यांच्या मोबाईलमध्ये लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार खेळत आणि खेळवत असताना आढळून आले. त्यांच्याकडून दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
पुढील तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत.




