• January 24, 2025
  • No Comment

अवैध सावकारांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

अवैध सावकारांवर कडक कारवाई करण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश

    पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध सावकारीची काही प्रकरणे निदर्शनास येत आहेत. यामुळे अशा गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश जारी केले आहेत.

    महाराष्ट्र शासनाने अवैध सावकारी गुन्हेगारीच्या संकटाला आळा घालण्यासाठी, त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, अधिक कडक आणि जरब बसविणाऱ्या तरतुदी असणारा विशेष कायदा महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 हा अंमलात आणला आहे.

    अवैध सावकारीच्या अनुषंगाने नागरिकांनी तक्रारी देण्यासाठी पुढे यावे म्हणुन जनजागृती मोहीम राबविणेबाबत, तसेच नागरिकांकडुन भरमसाठ व्याजाने पैसे उकळणारे, नागरिकांचा याबाबत छळ करणारे, धमक्या देणाऱ्या सावकारांविरुद्ध तात्काळ कठोर कार्यवाही करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.

    तसेच, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध सावकारी किंवा भरमसाठ व्याज आकारणी करुन कोणी फसवणुक करत असेल तसेच तद्अनुषंगाने तक्रारदारास धमक्या किंवा छळाचा धोका असल्यास संबंधितांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *