• January 24, 2025
  • No Comment

राज्याच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई, पुणे पोलिसांनी ड्रग तस्करांच्या आवळल्या मुसक्या

राज्याच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई, पुणे पोलिसांनी ड्रग तस्करांच्या आवळल्या मुसक्या

    पुणे: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पोलिसांनी ३ हजार ६०० कोटींचे ड्रग जप्त केले. राज्याच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कारवाई होती. या कारवाईत कुरकुंभ येथील एका कारखान्यावरही कारवाई करण्यात आली.

    यामुळे पुणे शहरातील ड्रग तस्करांना मोठाच चाप बसला आहे. यात ड्रग तस्करीचे परदेशातील कनेक्शनही उघडकीस आले आहे.

    पुणे शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नायजेरियन गुन्हेगार सक्रीय आहेत. ते परदेशातून, तसेच गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरची तस्करी पुण्यात करतात. त्यानंतर शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजेवाडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये त्याची ग्राहकांना विक्री करतात. यातील बहुतांश परदेशी तस्कर शिक्षण किंवा व्यवसायाच्या व्हिसाच्या नावाखाली येतात. स्थानिक विक्रेत्यांमध्ये महाविद्यालयीन मुलांचा मोठा समावेश असतो. हे सर्व रॅकेट मागील वर्षभरात झालेल्या कारवायांमुळे कोलमडले आहे. एक वर्षाच्या कालावधीत १२९ कारवाया करून २०४ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले.

    या कारवायांमध्ये ३ हजार ६८० कोटी २० लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले, तर २०२३ मध्ये १३५ कारवायांमध्ये पुणे पोलिसांनी २१५ जणांना अटक केली होती. त्यामध्ये १७ कोटी ८४ लाख ४५ हजारांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या वर्षात ललीत पाटील आणि त्याच्याशी संबंधित ड्रग तस्करी पुणे पोलिसांनी उघड केली होती. मात्र, त्यापुढे जाऊन पुणे पोलिसांनी ड्रग तस्करीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड केले.

     

    वर्ष गुन्हे अटक आरोपी जप्त अंमली पदार्थ

     

    २०२२ १५० २०० ९ कोटी ९३ लाख ३२ हजार ७९७

     

    २०२३ १३५ २१५ १७ कोटी ८४ लाख ४६ हजार

     

    २०२४ १२९ २०४ ३ हजार ६८० कोटी १९ लाख ९५ हजार

     

    गुन्ह्यांवरील पाळतीसाठी २,८८६ सीसीटीव्ही

    पुणे शहरात पोलिसांनी २०२५ मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या पोलीस ठाण्यांसह उपनगरांतील काही भागांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवण्यासाठी २,८८६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. हे कॅमेरे आधीपासून अस्तित्वात असलेल्या १,४०० कॅमेऱ्यांव्यतिरिक्त असतील. डोंगराळ परिसरात १८ आणि घाट परिसरात ६०९ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. राज्य सरकारने सीसीटीव्ही नेटवर्किंग प्रकल्पांसाठी ४३८.२२ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. याशिवाय टेकडी व घाट परिसरासाठी ८२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *