- January 24, 2025
- No Comment
धक्कादायक! धर्मांतरासाठी बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार

लोहगाव (पुणे): धर्मांतरासाठी एका महिलेवर बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
पुण्याच्या लोहगाव परिसरात हा प्रकार घडला आहे. यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. लोहगाव पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये धर्मांतर करण्यासाठी दोघांनी ३२ वर्षीय महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिला पुण्यातील लोहगाव परिसरात राहायला असून एका जिम ट्रेनरकडे जिम लावण्यासाठी गेल्यानंतर त्या दोघांची ओळख झाली. यानंतर तिला धर्मांतर करण्यासाठी प्रवृत्त करून एका ५५ वर्षे आरोपी आणि ३० वर्षीय आरोपीने बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
आरोपींनी सामूहिक बलात्कार केल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी ते महिलेला देत होते. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणात २ पुरुषांसह एका महिलेवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.




