- January 24, 2025
- No Comment
नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई

पुणे: पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे शहरातील रस्ते अपघातांत मोठी घट झाली आहे. शहरात २०२३ मध्ये ३३४ जणांचा अपघाती मृत्यू झाला, तर २०२४ मध्ये ३१० अपघाती मृत्यू झाले.
पुणे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने रस्ते सुधारणा आणि वाहतूक नियोजनासाठी विविध प्रयत्न केले आहेत. यामध्ये रस्त्यावरील अडथळे हटविण्याबरोबरच रस्त्याचा दर्जा सुधारणे, खड्डे बुजवणे, पट्टे आखणे आदी सुधारणा केल्या. याबरोबरच सातत्याने केलेल्या ड्रंग ॲण्ड ड्राइव्ह कारवाया, राँग साइड आणि ट्रीपल सीट वाहनचालकांवर कारवाई केल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाले.
नियमभंग मोडणाऱ्या वाहनचालकांचे वाहन परवाने रद्द करण्यासाठी आरटीओला प्रस्तावही पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांना चांगलीच जरब बसली आहे. त्यानुसार आरटीओने १३४५ परवाने रद्द केले आहेत, तर दुसरीकडे महापालिकेच्या मदतीने अपघातचे ब्लॅकस्पॉट ६० वरून ३६ इतके कमी करण्यात यश आले आहे.




