- January 24, 2025
- No Comment
पिंपरी चिंचवड: बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

वडगाव मावळ: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे आवारात असलेलली बेवारस वाहने घेऊन जाण्याचे आवाहन वाहन मालकांना करण्यात आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन आवारात वर्षानूवर्षे पडून असलेल्या बेवारस दूचाकी व चारचाकी वाहन मालकांनी आपली वाहने कागदपत्रे दाखवून, ओळख पटवून वडगाव मावळ कोर्ट यांच्याकडून आदेश प्राप्त करून आपली वाहने पूढील ६० दिवसांच्या आत ताब्यात घ्यावीत.
अन्यथा सदर वाहनांना बेवारस जाहीर करून कायदेशीर लिलाव करून रक्कम शासनास भरण्यात येईल, असे आवाहन तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी केले आहे.




