• January 25, 2025
  • No Comment

हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन तरुणींचा जागीच मृत्यू

हिंजवडीत रेडिमीक्स डंपर पलटी; दोन तरुणींचा जागीच मृत्यू

    हिंजवडी: हिंजवडी माण रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (दि. २४) दुपारी पावणे चारच्या सुमारास भीषण अपघात झाला. रेडिमीक्सने भरलेला डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार दोन तरुणी जागीच ठार झाल्या. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    अपघाताची माहिती अशी की, या तरुणी दुचाकीने (MH/12 XL 5744) चालल्या होत्या त्याच वेळी वडजाई नगर कॉर्नर येथे समोरून येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे डंपर पलटी होऊन दुचाकीस्वार तरुणी त्याखाली चिरडल्या गेल्या.

    दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या दोघी तरुणी जागीच ठार झाल्या.घटनास्थळी हिंजवडी पोलीस पोहोचले असून क्रेनच्या सहाय्याने डंपर उचलून तरुणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

    मृत्युमुखी पडलेल्या तरुणींची ओळख अद्याप पटली नसून दोन्ही तरुणी आयटी क्षेत्रातील अभियंता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *