• January 25, 2025
  • No Comment

डॉक्टरच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या कुलदीप सावंतला बेड्या, बिबवेवाडी पोलिसांची उल्लेखनीय कारवाई

डॉक्टरच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या कुलदीप सावंतला बेड्या, बिबवेवाडी पोलिसांची उल्लेखनीय कारवाई

    पुणे: जीवनसाठी डॉट कॉम या विवाह जमवणाऱ्या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवित नाव नोंदवून एका महिला डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवीत दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या आणि तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

    बिबवेवाडी पोलिसांनी मध्यरात्री त्याला नवी मुंबईमधून ताब्यात घेत पहाटे अटक केली. त्याचे आधीच लग्न झालेले असल्याचे समजल्यानंतर या डॉक्टरने मानसिक धक्क्यातून क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत आत्महत्या केली होती.

     

    कुलदिप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. उमराणी रोड, शंकर कॉलनी, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. पल्लवी पोपट फडतरे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. पोपट बाबुराव फडतरे (वय ५८, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बिबवेवाडीतील पीएमटी कॉलनी येथील तुळजाभवानी सोसायटीमध्ये ७ जानेवारी रोजी घडली होती.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुलदिप सावंत याचे लग्न झालेले आहे. तरीदेखील त्याने जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवत नाव नोंदवलेले होते. त्याने फिर्यादीची देहु येथे प्रत्यक्ष भेट घेतलेली होती. मात्र, त्याच्या वर्तणूकीविषयी शंका वाटल्याने त्याला त्यांनी नकार दिला होता. त्यानंतर त्याने पल्लवी हिच्याशी संपर्क साधला. तिला लग्नाचे आमिष दाखविले. पल्लवीचे शिक्षण बीएमएसएचपर्यन्त झालेले होते. तसेच, तिने बिबवेवाडीमधील तुळजाभवानी सोसायटीत क्लिनिक सुरू केले होते. कुलदिपने तिला जाळ्यात ओढले. वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून १० लाख रुपये उकळले.

     

    तिने लग्नाचा तगादा लावल्यावर त्याने आपले आधीच लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तिला मोठा मानसिक धक्का बसला. तिने त्याला दिलेले १० लाख रुपये परत मागितले. परंतु, त्याने तिला गांभीर्याने घेतले नाही. नैराश्यात गेल्याने तिने क्लिनिकमध्ये विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, तिचा ८ जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला.

     

    याप्रकरणी सखोल तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील आणि परीमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक शंकर साळुंखे यांनी एक पथक तयार केले. या पथकात उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक फौजदार सोमनाथ सुतार, अंमलदार सुमीत ताकपेरे, अजय कामटे, संतोष जाधव, नीलेश खोमणे, शिवाजी येवले, विशाल जाधव, प्रणय पाटील यांचा समावेश करण्यात आला. आरोपींचा माग काढत उपनिरीक्षक शशांक जाधव, सहायक फौजदार सोमनाथ सुतार, अंमलदार सुमीत ताकपेरे, अजय कामटे हे पथक नवी मुंबईत पोचले. याठिकाणी दोन दिवस कौशल्यपूर्ण तपास करीत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला पुण्यात आणून अटक करण्यात आली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *