- January 25, 2025
- No Comment
लोणी काळभोरमध्ये १६ लाख रुपयांचा गांजा जप्त; अंमली पदार्थ विरोधी पथक व लोणी काळभोर पोलिसांची संयुक्त कारवाई

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोरमध्ये कारवाई केली. पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या बातमीवरुन लोणकर वस्ती, येथील सार्वजनिक रोडवर भरतकुमार दानाजी राजपुरोहित (वय ३५) आणि आशुसिंग गुमानसिंग (दोघे रा. जि. जालोर, राजस्थान) यांच्या ताब्यातून १६ लाख ६७ हजार ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये ४० किलो ३९०ग्रॅम गांजाचा समावेश आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, अनिल जाधव, पोलीस अंमलदार संदिप शिर्के, योगेश
मांढरे, युवराज कांबळे, प्रशांत बोमादंडी, चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, आझाद पाटील, साहिल शेख, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर, सुनिल नागलोट, प्रदिप गाडे, प्रविण उत्तेकर, मारुती पारधी, विशाल दळवी, सचिन माळवे, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे, विनायक साळवे, योगेश मोहिते, रेहाना शेख, नुतन वारे यांनी केली आहे.
( महाराष्ट्र क्राईम वॉच प्रतिनिधी दिगंबर जोगदंड)