- January 25, 2025
- No Comment
महिलेचा स्टेटसला फोटो ठेवल्याचा जाब विचारल्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

काळेवाडी: नातेवाईक महिलेचा फोटे स्टेटसला ठेवला असल्याचा जाब विचारल्याने चौघांनी दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. २०) रात्री आठच्या सुमारास थेरगाव येथे घडली. व्यंकटेश सुभास राठोड (वय २८, रा.रेतगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी गुरूवारी (दि. २३) काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार, चंदु राठोड (२६), श्रीनिवास विराप्पा राठोड (२३), शिवा तिपन्ना राठोड (२४) व त्याचा साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी चंदु राठोड यांने फिर्यादी व्यंकटेश यांच्या नातेवाईक महिलेचा फोटो स्टेटसला ठेवला होता. फिर्यादी व त्यांचा मेव्हणा शेखर व सुनिल चव्हाण याचा जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी चंदु व त्याच्या साथीदाराने व्यंकटेश यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच सुनिल चव्हाण यांना लाथाबुक्याने मारहाण करत लाकडी दांडक्याने डोक्यामध्ये मारून जखमी केले.