• February 3, 2025
  • No Comment

महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक, महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची एक लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची आरोपींशी एका परिचितामार्फत गेल्या वर्षी जुलै महिन्यात ओळख झाली होती. व्यावसायिकाच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश हवा होता. आरोपींनी मुलीला प्रवेश मिळवून देण्याचे त्यांना दाखविले. त्यानंतर त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्यांच्या मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला नाही. प्रवेश न मिळाल्याने त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी टाळाटाळ सुरू केली. आरोपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *