• February 3, 2025
  • No Comment

सायबर चोरट्यांकडून तरुणाची २५ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून तरुणाची २५ लाखांची फसवणूक

    पुणे: सायबर चोरट्यांनी घरातून कामाची संधी असे आमिष दाखवून तरुणाची २४ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कोंढवा परिसरातील येवलेवाडी भागात राहायला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. घरातून कामाची संधी असे आमिष चोरट्यांनी संदेशाद्वारे दाखविले होते. चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला तरुणाला ऑनलाइन पद्धतीने काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला पैसे दिले. पैसे मिळाल्याने तरुणाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी त्याला आणखी पैसे जमा करण्यास सांगितले. या कामात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी तरुणाकडून वेळोवेळी पैसे घेतले.

    तरुणाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाला परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

    गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ शेख तपास करत आहेत. ऑनलाइन टास्क, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *