• February 6, 2025
  • No Comment

महागडी दारू बेकायदा पुरवणाऱ्या सराईतांवर पुण्यात धडक कारवाई, दोन आरोपी जेरबंद

महागडी दारू बेकायदा पुरवणाऱ्या सराईतांवर पुण्यात धडक कारवाई, दोन आरोपी जेरबंद

    पुणे: शहरातील मोठी हॉटेल्स, पब्ज आणि रिसॉर्ट्समधील पार्ट्यांमध्ये ग्राहकांना उच्च प्रतीचे विदेशी मद्य बेकायदा पुरवणाऱ्या दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे.

    राजकुमार नारायण उपाध्याय आणि दीपेशकुमार विजयकुमार साहा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

    आरोपींनी विदेशी मद्याच्या बाटल्यांसाठी राज्य सरकारला देय असलेले उत्पादन शुल्क न भरताच या मद्याची विक्री होत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, भरारी पथकाचे प्रमुख (क्रमांक एक) देवदत्त पोटे यांच्या आदेशानुसार वानवडी हद्दीतील लुल्लानगर चौक ते नेताजीनगर कॉलनी रस्त्यावर सापळा रचण्यात आला. त्यावेळी एक व्यक्ती राज्यात विक्रीस व स्वतःकडे बाळगण्यास बंदी असलेले उच्च प्रतीचे विदेशी मद्य विक्रीच्या उद्देशाने घेऊन जाताना आढळला. त्याच्या झडतीत विविध ब्रँडच्या ११ सीलबंद बाटल्या आढळून आल्या.

    शहरात आणि आसपासच्या परिसरातील मोठी हॉटेल्स, पब्ज आणि रिसॉर्ट्समध्ये होणाऱ्या पार्ट्या किंवा इव्हेंट्समध्ये ग्राहकांसाठी उच्च प्रतीचे बेकायदा मद्य नियमित पुरवले जात असल्याची माहिती या कारवाईमुळे उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे अवैध मद्य विक्री करणाऱ्यांना चाप बसण्यास मदत होईल.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *